चंदन चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा
आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिसोड येथील तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचे ९ किलो चंदन जप्त करण्यात आले आहे. जप्त चंदनाची किंमत २७ हजार रुपये असल्यांची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी गजानन नागाप्पा माळेकर यांच्या फिर्यादीवरुन रिसोड पोलीस ठाण्यात चंदन चोरीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणांतील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचान्यांना दिली होती. या सुचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर सलमान खान अजिज खान (वय ३५), शेख चांद शेर नुर मोहम्मद (वय अधिकारी पोलिसांनी संबंधित दोन्ही गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता, आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली

चंदन चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिसोड येथील तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचे ९ किलो चंदन जप्त करण्यात आले आहे. जप्त चंदनाची किंमत २७ हजार रुपये असल्यांची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी गजानन नागाप्पा माळेकर यांच्या फिर्यादीवरुन रिसोड पोलीस ठाण्यात चंदन चोरीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणांतील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचान्यांना दिली होती.
या सुचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर सलमान खान अजिज खान (वय ३५), शेख चांद शेर नुर मोहम्मद (वय ३८) आणि अब्दुल रहीम अब्दुल रज्जाक (वय ३७), तिघेही रिसोड, यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले तीन संशयित आरोपी व त्यांच्यासह पोलीस अधिकारी
पोलिसांनी संबंधित दोन्ही गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता, आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली
