Uncategorized

राजगुरुनगर : प्रभाग क्रमांक १० मध्ये स्वच्छता व मूलभूत सुविधांच्या कामांना गती

राजगुरुनगर : प्रभाग क्रमांक १० मध्ये स्वच्छता व मूलभूत सुविधांच्या कामांना गती

राजगुरुनगर : प्रभाग क्रमांक १० मध्ये स्वच्छता व मूलभूत सुविधांच्या कामांना गती

राजगुरुनगर : संतोष गाडेकर

राजगुरुनगर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सक्रिय नगरसेवक मित्रसेन डोंगरे व मिलिंद डोंगरे यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना सुरुवात झाली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत परिसरातील स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था आणि सांडपाण्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्यात येत आहेत.

प्रभागातील तुंबलेल्या गटारांची साफसफाई करून सांडपाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत झाली असून, परिसरातील स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीनेही या कामाचे महत्त्व आहे.

“स्वच्छ परिसर, सुरक्षित आरोग्य आणि नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा” हा दृष्टिकोन ठेवून प्रभागातील समस्यांचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्यावर भर दिला जात आहे. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, गटारे तसेच परिसरातील स्वच्छता यांसारख्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देण्यात येत आहे.

परिसरात रोगराईचा धोका निर्माण होऊ नये तसेच महिला, पुरुष आणि लहान मुलांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी स्वच्छता व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध कामांचा सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे दिसून येत आहे.

सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावणे, पाणी व स्वच्छतेच्या समस्या सोडवणे आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हा या कामांचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

नगरसेवकांकडून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या संबंधित विभागाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली असून, युवक व तरुण वर्गाचाही नगरसेवकांशी संपर्क वाढला आहे.

प्रभाग क्रमांक १० मध्ये विविध विकासकामांना गती मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. “नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रत्यक्ष कामे सुरू झाल्यामुळे आमचा विश्वास वाढला आहे,” अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

प्रभागातील प्रत्येक भागात आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत परिसराचा विकास करण्यासाठी नगरसेवक मित्रसेन डोंगरे व मिलिंद डोंगरे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!